लंडनमध्ये कर्जबुडव्या विजय मल्ल्या अटकेत मनी लॉंड्रिंग प्रकरणात मल्ल्यांवर कारवाई

0
लंडनमध्ये कर्जबुडव्या विजय मल्ल्या अटकेत मनी लॉंड्रिंग प्रकरणात मल्ल्यांवर कारवाई

लंडन : भारतातील बँकांना चुना लावून परदेशात पळालेला विजय मल्ल्याला अखेर अटक करण्यात आले आहे. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात विजय मल्ल्याला अटक करण्यात अल्याची माहिती ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसने दिली. अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचं वृत्त ‘दूरदर्शन’ने दिले आहे.

 


विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून आता प्रयत्न केले जातील. तशी परवानगी मिळाल्यास विजय मल्ल्याला भारतात आणलं जाईल.

कोट्यवधीचं कर्ज बुडवलं

किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

अटकेनंतर लगेच सोशल मीडियामध्ये ट्रोल सुरु झाले आहेत…

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.