विनेश फोगाट: रिओ ऑलिम्पिक जखम ते आशियाई स्पर्धा सुवर्णपदक
Rio Olympic आॅगस्ट २०१६…
“खत्म हो गया..सब खत्म हो गया…” तोंडात हे शब्द, डोळ्यांतून अखंड वहाणारं पाणी आणि प्लॅस्टरमध्ये गुंडाळलेला पाय…
व्हिलचेअरवर बसलेली विनेश फोगाट हतबलपणे समोर पहात होती. रिओ आॅलिंपिक्समध्ये ब्राँझ पटकावलेल्या साक्षी मलिकवर फुलांचा वर्षाव होत होता. सगळे कॅमेरे तिच्यावर रोखले होते.. पण सुवर्णपदकाचे स्वप्न घेऊन गेलेली विनेश मात्र कुस्ती खेळताना जबर जखमी होऊन व्हिलचेअरवरुन परतली होती.. गुडघ्याची हालत भयानक झाली होती. ‘मी पुन्हा कुस्ती खेळू शकेन का?? खेळले तरी पुर्वीच्या ताकदीने खेळेन का???’ असे असंख्य प्रश्न मनात येऊन ती पूर्णपणे खचली होती. सगळी स्वप्नं उध्वस्त झाली होती. डोळ्यांपुढं अंधार होता…
कट टू – २० आॅगस्ट २०१८…
विनेश फोगाट आशियाई खेळात भारतातर्फे सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली !!! फायनलची मॅच अफाट खेळली विनेश.. अक्षरश: दोन वर्षांपुर्वीच्या त्या दुर्दैवी घटनेची सगळी भडास काढल्यासारखी खेळली. जपानची तगडी कुस्तीपटू युकी इरी हिला तोंड वर काढू दिले नाही पठ्ठीने. ६-२ असा दणदणीत विजय मिळवून जकार्तामध्ये आपला तिरंगा फडकावला. क्या बात है ! इसे कहते है असली ‘फायटर’ !!
गुडघ्याची गंभीर दुखापतच नाही, तर वडिलांच्या खुनाच्या धक्क्यातूनही हिमतीने बाहेर पडून विनेशने मिळवलेले हे यश अनेक कुस्तीगीर महिलांना प्रेरणा देत राहिल ! विनेशचा संघर्ष पाहून जिगर मुरादाबादीच्या या ओळी आठवतात :
जो तूफ़ानों में पलते जा रहे हैं
वही दुनिया बदलते जा रहे हैं…!!!
किरण माने
(लेखक हे प्रसिद्ध अभिनेता-लेखक आहेत)
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर
History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!
नरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू