भाजपच्याच ट्विटर हँडलवरून चक्क मुख्यमंत्र्यांवरच निशाणा ..

0
भाजपच्याच ट्विटर हँडलवरून चक्क मुख्यमंत्र्यांवरच निशाणा ..

आज दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी भाजप च्या वेरीफाइड अकौंट वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल एक ट्वीट पोस्ट करण्यात आले.

”राज्यात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फडणवीस सरकार 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करायला निघालंय. मेक इन महाराष्ट्र आहे का फुल इन महाराष्ट्र?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

झालात ना अवाक्!… स्वाभाविकच आहे. पण असा प्रकार आज घडलाय. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून चुकून फडणवीस सरकारवरच टीका करण्यात आली आणि एकच कल्ला झाला.

सोशल मीडियावरुन विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केल्याचं नवीन नाही. मात्र भाजपच्याच अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयावर टीका करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Tweet against CM Fadnavis from BJP official twitter handle

विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टॅगही करण्यात आलं आहे.

3 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता हे ट्वीट करण्यात आलं. भाजप सोशल मीडिया सेलच्या हा प्रकार लक्षात येताच हे ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत या ट्वीटचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यामुळे सरकारला ट्रोल करण्याची आयती संधी नेटिझन्सला मिळाली. साधारण तासाभरानंतर हा प्रकार महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ ट्विट डिलिट करून टाकलं. पण तोवर त्यांची बरीच बदनामी झाली होती. त्यावर काही खुलासे करत बसण्यापेक्षा आत्तातरी त्यांनी गप्प बसणंच पसंत केलंय. पण, हे झालं कसं, केलं कुणी, नेमकी गडबड काय झाली, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सोशल मीडिया किती सावधपणे वापरला पाहिजे, याचा धडा त्यांना या प्रकाराने नक्कीच मिळाला असेल.

दरम्यान हा प्रकार कसा झाला, याबाबत भाजप सोशल मीडिया सेलकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

News Source

News Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.