अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या मुलीची तिच्या आईसह आत्महत्या

0
अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या मुलीची तिच्या आईसह आत्महत्या
Share

गेल्या दोन तीन दिवसात इंटरनेट वर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत होता. यातील मुलीने आत्महत्या केली असून आपण सामाजिक भान विसरून चाललो आहोत का यावर विचारमंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अश्लील व्हिडिओ मधील मुलगी आणि तिच्या आईची आत्महत्या

ही घटना उत्तरप्रदेशातील गोंडा येथील असून बुधवारी पहाटे ४० वर्षीय महिला व तिच्या २२ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मुलगी आणि तिच्या माजी प्रियकराचा अश्लील व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल झाला होता. प्रियकराने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने मुलगी खूप दिवसांपासून दबावात होती.

सदर २२ वर्षीय मुलीचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाआधी सुद्धा तिचा माजी प्रियकर सत्यम सिंह मुलीला त्रास देत होता. यावर पंचायतीमध्ये तक्रार सुद्धा केली होती परंतु सत्यम च्या वागणुकीत काहीही बदल झाला नव्हता. लग्नानंतरही तो मुलीला त्रास देत होता. गुण्यागोविंदाने नांदणार्या मुलीच्या पतीला 22 मार्चच्या रात्री सत्यमने आपला आणि त्या मुलीचा अश्लील व्हिडिओ पाठविला आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.

या व्हिडिओ नंतर मुलीचे नवऱ्यासोबत संबंध बिघडले आणि ती आपल्या माहेरी परतली. तिने घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली. यानंतर, ती आपल्या मुलीसह आपल्या माहेरी गेली होती. पण सत्यम सिंगने फोन करून धमक्या देत त्यांना घरी परत येण्यासाठी दबाव आणत होता. इतकेच नाही तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. आई मुलगी दबावातून घरी परतली. परंतु आई-मुलीने अस्वस्थ होऊन मंगळवारी रात्री उशिरा घरापासून काही अंतरावर शेतातील झाडावर फास घेऊन जीव दिला.

सकाळी ग्रामस्थांनी दोघींचे मृतदेह पाहिले तेव्हा गावात खळबळ उडाली. माहितीवरून पोलिस अधीक्षक शैलेशकुमार पांडे, जिल्हा अधिकारी मार्कंडेय शाही, पोलिस स्टेशन प्रभारी तारागंज, माजी ग्राम प्रधान प्रतिनिधी रंजन बाबा, चौकी प्रभारी जय हरि मिश्रा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सत्यमला ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपूस सध्या सुरू आहे.

आपण सुद्धा असे व्हिडिओ शेअर करण्याआधी विचार करायला हवा. आपल्यामुळे एखाद्याच्या जीवनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो हे आपल्याला कदाचित आता समजले असेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.