सलग दुसऱ्या द्विशतकासह विराटची सचिन च्या विक्रमाशी बरोबरी ?

0
सलग दुसऱ्या द्विशतकासह विराटची सचिन च्या विक्रमाशी बरोबरी ?

कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सलग दुसरे द्विशतक झळकावत सचिन, सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Photo Credit's
मागच्या मॅच चा फॉर्म राखत दिल्लीच्या फिरजशहा कोटला मैदानात त्याने कारकिर्दीतील सहावे द्विशतक ठोकले.
Virat Kohli Net Worth: Biography How Much is The India Cricket Captain Worth?
कसोटी सामन्यात सहावे द्विशतक झळकवणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी कसोटी सामन्यात ६ द्विशतके झळकावली आहेत त्याचीच बरोबरी कोहलीने केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी ५२ सामन्यात १२ द्विशतके ठोकली असून हा आश्चर्यकारक पराक्रम केला होता.
Photo Credit's
त्यानंतर अकरा द्विशतकांसह संगकारा दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा ने १३१ सामन्यात ९ द्विशतके झळकावली आहेत. इंग्लंडचे दिग्गज हॅमॉन्ड आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने यांनी प्रत्येकी ७ द्विशतकासह यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थान पटकावले आहे.
विराट कोहलीला अजून बराच पल्ला गाठायचा असून तो हे विक्रम मोडेल का हे पहावे लागेल.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.