मुझे लडकी मिल गयी’, असे ट्विट करत बॉलिवूडमधील दबंग सलमान खान नमंगळवारी कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता ताणली होती.
या ट्विटमुळे सलमान खान शेवटी लग्न करतोय की काय?, अशी चर्चा होऊ लागली होती.
Mujhe ladki mil gayi
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 6, 2018
मात्र, या ट्विटमागील गुपित अखेर दोन तासांनी स्वतः सलमान खान ने उघड केले.
सलमानला भेटलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा आगामी सिनेमा ‘लवरात्री’ सिनेमातील नवीन अभिनेत्री आहे. वरीना असे तिचे नाव आहे. आयुष शर्मा लवरात्री चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमामध्ये सलमान व वरीना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Nothing to worry na @aaysharma ki film #Loveratri ke liye ladki mil gayi Warina, Toh dont worry na be happy na pic.twitter.com/uetTpUKRdi
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 6, 2018
कॅडबरी सिल्क चॉकलेटच्या जाहिरातीत झळकलेली वरीना सलमान खान ला अभिनेत्री म्हणून आवडली असून त्यासाठी त्याने आयुष शर्मांसोबत बोलणी करुन तिला आगामी सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर दिली.
वरीना कोण आहे
२३ वर्षाच्या वरीनाने नामांकित न्यू-यॉर्क फिल्म अकॅडमी मधून वरीनानं आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. तिची आई अफगाणी आणि वडील इराणी आहे. लहान वयापासून तिला मॉडेलिंग ची आवड असल्याने तिने तो छंद जोपासला होता.
सुप्रसिद्ध ब्रॅन्ड्रच्या जाहिराती करत तिने आपले करिअर सुरू केले.
आयुष शर्मा चा आगामी चित्रपटासाठी सलमान खान सोबत शोभणार्या अभिनेत्रीचा शोध चालु असता सलमान ने आपल्या आगामी सिनेमासाठी वरीना च्या नावाला पसंती दर्शवली आहे. आयुष शर्मा यांच्या ‘लवरात्री’ या आगामी सिनेमामध्ये वरीना झळकणार असुन या नवोदित अभिनेत्रीला बॉलीवूड चाहते किती पसंद करतात हे पहावे लागेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
रिंकू राजगुरू चा कागर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
बॉलीवूडचा हा खान साकारणार होता राजा रावल रतन सिंग यांची भूमिका