मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती ? शपथपत्रात केली जाहीर

0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती ? शपथपत्रात केली जाहीर

मुंबई:
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिनांक १२ मे २०२० रोजी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती अधिकृत जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये असून  त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर. सोबतच कर्जत येथे ठाकरे यांचे फार्म हाऊस आहे.
 
विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नामनिर्देशन भरताना

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हे आता विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप होते. त्यांनी थेट संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही असा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती आज अधिकृत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये आहे.
उद्धव ठाकरेंकडे एकूण 3 बंगले आहेत. वांद्रे पूर्व कला नगर येथे मातोश्री बंगला आणि मातोश्रीच्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर, कर्जत येथील फार्म हाऊसचा या संपत्तीत समावेश आहे.

विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

©PuneriSpeaks

अशाच नवनवीन अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.