म्युचुअल फंड म्हणजे काय? Mutual Funds Scheme in Marathi
म्युच्युअल फंड (Mutual Funds Scheme) बद्दल अनेक लोकांना समज गैरसमज असतात. अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकजण Mutual Funds Scheme मध्ये पैसे गुंतवणूक करणे टाळतात. अनेकांना Mutual Fund किचकट आणि गुंतागुंतीचे वाटतात.
Mutual Funds Scheme in Marathi
थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांच्याकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते. अशा लोकांसाठी Mutual Funds हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. आपण पैशाची गुंतवणूक केल्यानंतर तज्ञ फंड व्यवस्थापक हे त्या म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. आपण केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन फंड व्यवस्थापक (Fund Manager Marathi) वर्गीकरण करत वेगवेगळ्या शेअर मध्ये गुंतवणूक करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
आपल्या देशात प्रथमतः भारत सरकारच्या सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या अँँसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सार्वजनिक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ पेक्षा अधिक म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक करताना तुमच्यासारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात, यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोडो रुपये) त्या योजनेत जमा होत असतात. यामुळे फंड मॅनेजरला अनेक विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारखे ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केले जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV =तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य (NAV) जाहीर केले जाते. प्रत्येक म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध असते. आपल्या युनिट्स ची किंमत आपल्याला कोणत्याही शेअर मार्केट वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकते.
Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामाहीन्यातून कधीतरी एकदाच ते पहावे. म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवल्यास आपल्याला अनेक पटींनी फायदा होतो. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यात वार्षिक Lumpsum SIP असा पर्याय सुद्धा उपलब्ध असतो. परंतु दर महिना केलेल्या गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळवून देतो.
तेजी मंदी हा शेअरबाजाराचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तो वरच जात असतो. एक लक्षात ठेवा कि सेन्सेक १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी ३१८१४ झाला होता. गेल्या ३८ वर्षात सेन्सेक्स ने वार्षिक १५% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. शेअर बाजार पडल्यास युनिट्स ची किंमत कमी होते, त्याचवेळी गुंतवणूक केल्यास जास्त युनिट्स मिळतात. तेच युनिट्स आपण शेअर बाजार तेजीत आल्यावर विकल्यास वार्षिक १५-२० % पर्यंत आपल्याला फायदा होई शकतो. जेवढे जास्त वर्षे आपण गुंतवणूक करू तेवढा जास्त परतावा मिळत असतो. ६ महिने ते १ वर्षातून आपल्या Mutual Funds Scheme ची स्थिती तपासून पहा.
Mutual Funds Scheme मध्ये गुंतवणूक कशी करावी?
Mutual Funds चालवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. SBI, Axis Bluechip, DSP, Aditya Birla, Kotak, ICICI अशा अनेक कंपन्या आपापले फंड चालवत असतात. त्यांचा वार्षिक परतावा पाहून आपण गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करताना त्यातील Risk समजून घ्यायला हवी. प्रत्येक फंड ची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात आहे हे त्या फंड च्या माहितीपत्रकामध्ये लिहिलेले असते.
Mutual Funds Types in Marathi
Mutual Funds Scheme अनेक प्रकारात विभागली गेली आहेत.
Mutual Funds दोन विभागात विभागलेले असतात. यात पुन्हा अनेक प्रकार आहेत.
Open Ended Mutual Funds
म्युच्युअल फंडाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ओपन-एन्ड फंड. म्युच्युअल फंड चे NAV (नेट अॅसेट व्हॅल्यू) ट्रेड युनिट असतात. Open Ended Mutual Funds मध्ये फंड गुंतवणूकदारांना कधीही बाहेर पडता येऊ शकते आणि एनएव्हीच्या आधारे त्यांना पैसे मिळतात, जे फंड हाऊसद्वारे दररोज प्रकाशित केले जातात.
Close Ended Mutual Funds
नवीन फंड ऑफर (एनएफओ) बंद केल्यावर, गुंतवणूकदार त्यांच्या युनिटमध्ये व्यापार करू शकत नाहीत. Closed म्युच्युअल फंडाची किंमत समभागांप्रमाणेच मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असते. Closed म्युच्युअल फंड Liquid नसतात आणि व्यापाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे किंमती प्रति युनिटच्या सामान्य किंमतीपेक्षा कमी असतात. योजनेची मुदत संपेपर्यंत गुंतवणूकदार योजनेत प्रवेश करू शकत नाहीत किंवा बाहेर पडू शकत नाहीत. यात मर्यादा असतात.
कशी वाटली माहिती? अशा अनेक Updates साठी follow करा अस्सल पुणेरी (@PuneriSpeaks) ला
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
ऐतिहासिक वाचण्यासाठी:
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
@punerispeaks artista ajinkya articles Artista Ajinkya Bhosale Artista Ajinkya bhosale article BJP Bollywood Breaking News in Marathi Cricket India Indian army Latest Marathi News latest news in marathi maharashtra marathi marathi batmya Marathi News Mumbai narendra modi NCP PCMC pimpri chinchawad pune pune news Salman khan Satara Sharad Pawar Shivaji Maharaj twitter USA virat kohli अजिंक्य भोसले अजिंक्य भोसले लेख देवेंद्र फडणवीस पुणे मराठा मराठा साम्राज्य मराठी महाराष्ट्र राज ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार शिवाजी महाराज शेतकरी सातारा सुप्रिया सुळे