CIBIL SCORE काय असतो?

0
CIBIL SCORE काय असतो?

CIBIL SCORE काय असतो? Cibil Score म्हणजे काय? हा आपल्याला रोज पडणारा प्रश्न आहे. हा प्रश्न पडणाऱ्यांसाठी आणि नवीन मार्केट मध्ये येणाऱ्यांसाठी हा लेख अत्यंत कामी येऊ शकतो.
आता बघा, आपण रोज कित्येक ठिकाणी ऐकतो लोन घ्या, लोन घ्या सिबील चांगला नसला तरी लोन मिळेल, फेकूचंद असतात हे , पण असो .

हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ? What is Cibil Score in Marathi?

Cibil Score information in Marathi

बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit)
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit)

या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .

पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा. त्यामुळे लोकांनी २-३ बँकेतून कर्ज घेतले तरी कोणा दुसऱ्या बँकेला ठावठिकाणा लागायचा नाही. जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट. आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून Credit Information Bureau Ltd या कंपनीची स्थापना Aug 2000 मध्ये झाली. आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे . TransUnion CIBIL Ltd ही कंपनी भारतातल्या सर्व लहान-मोठ्या बँका, वित्तीय संस्था यांच्याशी जोडली गेलेली आहे आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .

समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला, तर बँक म्हणते दोन-तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL Report मागवते आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा CIBIL Score चेक करते.

जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर, नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़.

CIBIL SCORE CHECK

CIBIL स्कोर हा 300 ते 900 अंकांमध्ये मोजला जातो . जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळते. पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक  तुमचा CIBIL SCORE नीट करून आणा असे म्हणते. त्यामुळे कर्ज मिळतच नाही .

म्हणजे समजलं ! कि बँका कर्ज देणे का नाकारतात ? CIBIL Score नीट नसल्यामुळे बँक आपले कर्ज नाकारत असते.

CIBIL Score कमी का होतो ? Why CIBIL Score reduced?

1) कर्जाचा EMI वेळेवर न भरणे
2) कर्जाची परतफेडच न करणे
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे

अशा अनेक कारणांचाCIBIL S core वर वाईट परिणाम होत असतो.

CIBIL SCORE कसा चेक करावा? How CIBIL Score Checked?

https://www.cibil.com/

या संकेतस्थळावर आपण आपला CIBIL SCORE पाहू शकता. CIBIL Score in Marathi

बघा, मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी शेवटी त्यांना सर्व माहिती केन्द्रीयकरणामुळे CIBIL ला द्यावी लागते. आपला प्रत्येक व्यवहार हा CIBIL ला समाजात असतो. तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते .

याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही . (आता काही जण मल्ल्याचं नाव घेऊन , उलट सुलट चर्चा करतील , पण तशा केसेस वेगळ्या असतात) .

बघा मुळात बँकाचा महत्वाचा व्यवसायच कर्ज देणे हा आहे, पण कर्जाची किंमत योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते . त्यावरच बँकेचे अस्तित्व टिकून असते.

CIBIL score कसा सुधारावा ? How to Improve CIBIL Score in Marathi ? Cibil score कसा वाढवावा?

1) EMI वेळेवर भरा, चुकवू नका किंवा उशीर करू नका .

2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )

3) Home Loan, Vehicle Loan , Education Loan , Personal Loan कोणतेही कर्ज असू दया, त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत, ही शिस्त सांभाळा

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली, समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही .

6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky ग्राहक सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .

CIBIL Score निव्वळच कमी असणे म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते .

या मध्ये
NA – No Activity
NH – No History

असे पर्याय दिसू शकतात .

तर काय करा की, एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा, अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल. ज्यामुळे आपल्याला मोठ्या कर्जासाठी CIBIL Score कामी येईल.

बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही, आपण बँकांना, त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो, बँकेसमोर बँड वाजवतो, आंदोलनं करतो, धरणे देतो.

Advantages of high CIBIL Score
Photo Credits: 99acres.com

पण राजे हो , कर्ज मिळण्या पाठीमागे एवढा सगळा पसारा असतो .
इथे सगळेच CIBIL Score वर चालते .
त्याच्या बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही.  जरी दिल्यास ते कर्ज बुडीत निघाल्यास त्याची पडताळणीत कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते.

म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज असो ते बुडवू तर नका, परंतु वेळेत फेडा !

नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी राहणार नाही. CIBIL Score in Marathi लेख आपल्याला कसा वाटलं आम्हाला नक्की कळवा.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Best Misal in PUNE, Famous Misal Pav Hotels in Pune List | PUNE

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.