साधा विचार: लग्न म्हणजे काय? | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
साधा विचार: लग्न म्हणजे काय? | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

साधा विचार: लग्न म्हणजे काय?

एक विचार करत नाही आपण लग्न करण्याआधी. पहिले म्हणजे आपला, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आणि मूळ लग्नाचा. खरतर लग्न हि रीत परंपरा नसून एक नात बनवण्याची क्रिया आहे. लग्न म्हणजे दोन जिवांच मिलन असते. शिव-सती (शक्ती) ची अनुभूती या कलियुगातही घ्यायला मिळणे म्हणजेच लग्न होय. लग्न जातीच नसते. लग्न धर्माच नसते. लग्न असते ते फक्त दोन जिवांच. एक स्त्री एक पुरुष यांचे. या भिन्न लिंगांचे एकत्र येणे म्हणजे साक्षात निसर्गाची नवीन उत्पत्ती होणे असाच त्याचा अर्थ होतो.

प्रेम, आकर्षण, भावना, संभोगाची भावना या सगळ्या आणि बऱ्याच भावनिक नात्यातल्या पैलूंची एकाच ठिकाणी जी खुणगाठ बांधली जाते ते नाते म्हणजे लग्न. मृत्यूला जसे कोण मुकल नाही. तसे लग्नाला हि कोनी मुकल नाही. साक्षात देव ही नाही आणि माणूस ही नाही. देवालाही संसार करावा लागला. माणसाला सुद्धा संसार करावा लागतोच की. स्त्री शक्तीत सतीची उपासना करणे आणि पुरुष जातीत महादेवाची आराधना करणे हाच आहे संसार. जो करतो संसार तोच यातले बारकावे जाणतो.

असो, तर आजकालच्या वेगवान जगात प्रेम अगदी वेगान होत. प्रेम मग आकर्षण आणि मग होते इच्छा कामवासनेची. कामवासनेच सत्यात मिलन होत आणि हरवून जातो आपण शिवशक्तीला अनुभवण्याची मजा. लग्न, एक विटाळ आहे अस मानणारी तरुण पिढी कोण चुकत नाही यातून प्रत्येकाला हे लग्न करावेच लागते. समाजाला सर्वस्व मानणारे आपण जग काय म्हणेल जग काय प्रतिसाद देईल या विचारा बाहेर आपण पडत नाही. म्हणजे आपण एक प्रकारे समाजालाच आपले सर्वस्व मानतो समज येण्यापासून मरेपर्यंत. मग यात आपला नवरा/बायको येते कुठे? आपलं सर्वस्व फक्त म्हणण्यापुरता असतो का नवरा किंवा बायको?.

एक मुलगी वयात येते, आणि मग पुरुषजातीचे वसवसणारे लोक मागे लागतात. त्यातून स्वताला सावरत मुलीने आपला चेहरा लपवत, जगाच्या रितीनुसार वागत भान राखाव लागत. त्यात कुठे थोडी पाठ उघडी पडते तर ओढणीच्या दोन टोकात लपवताना कुठे छाती उघडी पडते, त्याचा दोष हा मुलीलाच. त्यात मुलीचा जीन्स शर्ट असेल तर तेही नाही झाकल जात. सौंदर्य एक शापच आहे स्त्री जातीला आणि पुरुषाला शाप आहे त्याच्या पुरुषार्थाचा. अशात ती घरी सांगू शकत नाही. बाहेर कुणाशी बोलू शकत नाही.

अशा बाहेरच्या समाजाला तोंड देताना कोणीतरी बाहेरचा साथ देणारा हवा म्हणून एकाला कुणाला ती जवळ करू पाहते. चूक काहीच नसते तीची, तिच्यावर प्रेम करणाऱ्याचीही काय चुकी? तोही पुरुष प्रेम करतो. मग ओढ लागते दोघांत शरीर सुखाची. पण निसर्ग तत्वाला आपण निम्म ही न ओळखणारे लोक स्त्री तत्वाला पुरुष तत्वाला न ओळखता शरीर सुख देऊच कस शकतो? अशा या न ओळखीच्या नात्यात ओळख असते ती फक्त शरीराची, मनाची नाही. मग अशात मुलगी हक्क देते आपल्या शरीराचा त्या पुरुष तत्वाला आणि पुरुष तिला आपलं मानत सगळ सुख देऊ करत असतो तिला. मग अशा वेळेस स्त्री तत्वाची, प्रेमाची शक्ती अफाट अचाट असते. कितीही प्रेम दोघात असो पण नेहमी स्त्री जातीच प्रेमच नेहमी ज्यादा असत.

अशा या शिव-शक्तीला न जाणता आपला, आपल्या कुटुंबाचा, समाजाचा कसला कसला विचार न करता पळून जाऊन लग्न करणे हा उपाय आजकाल समाजात रूढ होत चाललाय. नंतरच्या दिवसाचं कोण विचार करत नाही. पण कोण विचार करत का लग्नाचा? जो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि संसार करत जगत मरून जाण हे सुद्धा आपल्याला अनिवार्य आहे. समजेल का हे कुणा तरुण मुलाला मुलीला? कि असेच बिनबुडाचे प्रेम करत राहणार? तत्व विना? शिवशक्तीचा अनुभव न घेता?
साधा विचार आहे हा एकदा विचार करा….. लग्न म्हणजे काय?

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.