यशस्वी लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकत वाचत आलो आहोत. आपणही यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावं, जगावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, हे यश असेच सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी यशस्वी लोकांमधील काही गुण आपल्यात असणे आवश्यक आहे.
What Successful People Do Before Bed
असे म्हणतात कि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे काम करता त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कामावर होत असतो. यासाठीच जगातील सर्वाधिक यशस्वी व्यक्ती झोपण्यापूर्वी नेमकं काय करतात? हे जाणून घेऊयात.
चला तर मग पाहूयात जगातील काही यशस्वी लोकांच्या बेडटाईम सवयींबाबत…
What Successful People Do Before Bed

बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक
बिल गेट्स रात्री झोपण्यापूर्वी वाचन करणे पसंद करतात.
बायोग्राफी, इतिहास, तत्त्वज्ञानाशी संबंधित पूस्तकांचे वाचन बिल गेट्स नेहमी करत असतात.
बिल गेट्स कमीत कमी ७ तास झोप घेतात. त्याशिवाय त्यांचे कामात मन लागत नाही असे ते म्हणतात.
बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
बराक ओबामा रात्री झोपण्यापूर्वी वाचन आणि लिखाण करतात. बराक ओबामा यांना हि सवय पूर्वीपासून आहे. The Audacity of Hope हे त्यांचे चर्चेत राहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.
रोज मध्यरात्रीपर्यंत बराक ओबामा वाचन करतात आणि त्यासोबतच काहीतरी लिखाणही करतात.
बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ११ वाजेपर्यंत मीटिंग करत असत. त्यानंतर वाचन आणि मग रात्री १ वाजता झोपायचे आणि पून्हा सकाळी ७ वाजता त्यांची कामाला सुरुवात होते असे.
अॅलन मस्क, टेस्ला कंपनीचे संस्थापक

अॅलन मस्क हे रात्री १ ते सकाळी ७ वाजेपर्यंत झोपतात. ते सहा तास झोप घेणे पसंद करतात.
कधी-कधी दिवसभरात ७-८ डाईट कोक पित असतात . असे केल्याने त्यांना दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते असे ते मानतात.
स्टीफन किंग, लेखक

अमेरिकेतील हॉरर लेखनासाठी प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग हे रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रश करून आपले हात स्वच्छ धुतात.
सर्व उशा एकाच दिशेला जमवून ते झोपतात. यामागचं कारण त्यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये. ही एक वेगळी सवय असल्याची ते मानतात.
आपल्याला लेख आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन पोस्ट साठी आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.