साप चावल्यावर काय करावे? दवाखान्यात जाईपर्यंत कोणती काळजी घ्यावी? सापाचे प्रकार

0
साप चावल्यावर काय करावे? दवाखान्यात जाईपर्यंत कोणती काळजी घ्यावी? सापाचे प्रकार
Share

साप चावल्यावर काय करावे? दवाखान्यात जाईपर्यंत कोणती काळजी घ्यावी? याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. कारण अनेकजण माहिती अभावी चुका करून आपला जीव गमावतात किंवा भीतीनेच जीव जाण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. आधी आपण सापाबद्दल काही माहिती करून घेऊ

सापाचे प्रकार

 • एक विषारी उदा. नाग,मण्यार फुरस,घोणस
 • दुसरा बिनविषारी उदा.धामण,दिवड, पाण्याळी (वेरुला)

बिनविषारी साप जर चावला तर घाबरायचे कारण नाही त्यामुळे तुमच्या जीवाला धोका नाही. डॉक्टर कडे जाऊन मलमपट्टी करून घेतल्याने जखम बरी होईल. विषारी सर्प चावला तरीपण घाबरायचे नाही, विषारी सर्प चावल्यानंतर मानसिक संतुलन ढासळू द्यायचे नाही. शांत राहायचे, कारण सर्प चावल्या नंतर लगेच काही होत नाही.

अनेकजण साप चावल्यावर घाबरून जातात आणि रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढल्याने सापाचे विष जलदगतीने शरीरभर लवकर पोहचायला मदत होते आणि मृत्यू होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे साप चावल्यानंतर शांत राहणे हा प्रथम उपाय म्हणावा लागेल. यानंतर एका तासाच्या आत डॉक्टर कडे जायला हवे. खास करून मोठी सरकारी हॉस्पिटल किंवा मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यास तिथे औषधें उपलब्ध असण्याची शक्यता जास्त असते. गावातल्या इतर छोट्या डॉक्टरकडे जाऊन वेळ वाया घालवल्यास जीवावर बेतू शकते.

साप चावल्यानंतर विषारी की बिनविषारी कसे ओळखायचे?

साप चावल्यानंतर विषारी की बिनविषारी कसे ओळखायचे?
सर्पमित्र विनायक कांबळे (Quora)

वरील छायाचित्रात साप चावल्यानंतर शरीरावर होणाऱ्या जखमा याचे उदाहरण पाहायला मिळते. त्यावरून सर्प कोणता चावला आहे हे ओळखायला मदत होते. कोणत्याही विषारी सापाने चावले तरी फोटोत दाखविले आहे त्याच प्रकारे खूण होते.

विषारी साप चावल्यावर काय करायचे?

 1. घाबरायचे नाही. घाबरल्यास रक्तदाब वाढून विष संपूर्ण शरीरभर पसरू शकते.
 2. जिथे सर्प चावला असेल तर ती जखम सोडून त्या जखमेच्या वरती दोरीने सैल बांधावे. (जास्त घट्ट बंधू नये, नाहीतर संपूर्ण रक्तप्रवाह थांबून तो अवयव निकामी होऊ शकतो)
 3. प्रत्येक सापाचा विषावर वेगवेगळी प्रतिजैविके असतात त्यामुळे कोणता विषारी साप चावला त्या सापाचे वर्णन डॉक्टरांना सांगा, जेणेकरून उपचार करणे सोप्पे जाईल
 4. पायावर साप चावला असल्यास बूट काढावेत
 5. सूज येण्यापूर्वी चावलेल्या भागाच्या आसपासचे दागिने काढा
 6. लवकरात लवकर रुग्णाला दवाखान्यात भरती करा. अशा क्षणी वेळ खूप महत्त्वाचा आहे.

विषारी साप चावल्यावर काय करू नये?

 1. सापालापकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करा. आपण दुसऱ्यांदा चावण्याचा धोका पत्करू नका.
 2. विष चोखून काढण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आपल्या तोंडात विष पसरण्याचा धोका आहे.
 3. पीडितेला हातपाय हलवू देऊ नका. रुग्णाला स्ट्रेचरवर ठेऊन रुग्णाला दवाखान्यात पोहोच करा.
 4. डॉक्टरांच्या सल्ल्याविना रक्त पातळ करणारी एस्पिरिन, इबुप्रोफेन किंवा इतर पेनकिलर वापरू नका.
विषारी साप चावल्यावर काय करायचे?

साप हा सर्वात भित्रा प्राणी आहे. अनेकवेळा घाबरून किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी तो चावतो. सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात त्यामुळे सापांना मारू नका. घराजवळ साप आला तर सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचे संवर्धन करण्यास मदत करा.

साभार:

 1. सर्पमित्र विनायक कांबळे
 2. WebMD

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.