व्हॉट्सअॅपद्वारेही पैसे पाठवता येणार..

0
व्हॉट्सअॅपद्वारेही पैसे पाठवता येणार..

व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या देशात सर्वाधिक असल्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘डिजिटल पेमेंट्स’ सोपं होणार आहे..

कॅशलेस : Digital Payment Feature

व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप म्हणून देशात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉट्सअॅपही डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यास सज्ज झालं आहे. व्हॉट्सअॅप नवीन पेमेंट फिचर सुरू करणार असून पुढील महिन्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅप ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)’वर आधारित पेमेंट सुविधा SBI, ICICI Bank, HDFC Bank आणि AXIS Bank या बँकांच्या सहकार्याने सुरू करणार असून. एका बँकेसोबत या फिचरचे टेस्टिंग सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ‘सिक्युरिटी चेकिंग’ होताच काही ठराविक युझर्सच्या माध्यमातून त्याचं अंतिम टेस्टिंग सुरू होईल. त्यानंतरच हे फिचर सर्वांसाठी खुलं होणार असल्याचं समजतं.

व्हॉट्सअॅपला गेल्या जुलैमध्येच सरकारची यूपीआयसोबत एकीकरणासाठीची परवानगी मिळाली. त्यामुळे व्हॉट्सअॅपचा थेट इन्स्टंट पेमेंट सुविधा देण्याचा मार्ग खुला झाला आहे.

पैसे पाठविणारा व पैसे स्वीकारणारा यांची ओळख पटविण्यात व्हॉट्सअॅप मुख्य भूमिका बजावत असताना व्हॉट्सअॅपच्या पेमेंट्स सुविधेला बँकांसोबत जोडले जाणार असल्याने ते युझर्सच्या बँक अकाउंटचीही ओळख पटवेल आणि नंतर यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहारासाठी मदत करेल.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज पाठविणं जेवढं सोपं आहे, तेवढच पैसे पाठविणंही सोपं व सुरक्षित व्हावं, याची खबरदारी व्हॉट्सअॅपला घ्यावी लागणार आहे. काही बँकर्सचं असं म्हणणं आहे.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

For more :

Bigg Boss चे आत्तापर्यंतचे विजेते: शिल्पा शिंदे, श्वेता तिवारी, जुही परमार ते विंदू दारा सिंग

 

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.