गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

0
गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

मी रुग्णालयात आहे, बाहेर आहे किंवा अन्य ठिकाणी आहे, असं सांगून गंडवागंडवी करणाऱ्यांना तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करायला सांगून, उघडं पाडू शकता.

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं आहे. यापुढे व्हॉट्सअॅप वरुन तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपवरून लोकं तुमच्याशी खोट बोलत असल्याचा संशय तुम्हाला वारंवार येत असेल. तर लाईव्ह लोकेशन फीचरमुळे त्यांची पोलखोल करता येणार आहे.

मी रुग्णालयात आहे, बाहेर आहे किंवा अन्य ठिकाणी आहे, असं सांगून गंडवागंडवी करणाऱ्यांना तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करायला सांगून, उघडं पाडू शकता.

तुमच्या खाजगी आणि ग्रुप चॅटमध्येही तुम्ही हे लाईव्ह लोकेशन कोणालाही पाठवू शकणार आहात. तसंच आपात्कालिन परिस्थितीत तुम्ही सुरक्षित आहे की नाही  हे लाईव्ह लोकेशनच्या आधारे तुमच्या घरच्यांना कळवू शकाल.

व्हॉट्सअॅपवरुन आताही लोकेशन शेअर करता येतं, मात्र त्याद्वारे लाईव्ह लोकेशन कळत नव्हतं.  पण व्हॉट्सअॅपने आता त्यापुढेही मजल मारुन Live Location शेअरिंग फीचर अॅड केलं आहे.

या फीचरमुळे काय होईल?

व्हॉट्सअॅपच्या Live Location फीचरमुळे तुम्ही लोकेशन शेअर केला आणि तुमचा प्रवास सुरु असेल, तर तुमचं लाईव्ह लोकेशन कळू शकेल.

Live Location हे कोणालाही पर्सनल व्हॉट्सअॅप किंवा ग्रुपवर पाठवू शकता.

ठराविक काळासाठी हे फीचर काम करेल. काही वेळानंतर पुन्हा तुम्हाला लोकेशन शेअर करावं लागू शकतं.

हे फीचर कसं काम करतं?

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन, Attach वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय दिसेल तो निवडा. त्यानंतर तुम्हाला कालमर्यादा विचारली जाईल. यामध्ये 15 मिनिट, 1 तास आणि 8 तास असे पर्याय दिसतील, तो आपल्या सोईनुसार निवडा.

लाईव्ह लोकेशन तुम्ही म्यॅनुअली बंद करु शकता.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.