WhatsApp मध्ये येत आहेत नवीन फीचर्स, स्टोरेज चा प्रश्न सुटणार

0
WhatsApp मध्ये येत आहेत नवीन फीचर्स, स्टोरेज चा प्रश्न सुटणार
Share

WhatsApp न वापरणारा शोधून सापडणार नाही. प्रत्येकजण संदेश पाठवण्यासाठी अॅप चा वापर करत असतो. आता हेच WhatsApp आपल्यासाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच कंपनीने डार्क मोड, स्टिकर्स असे नवनवीन फीचर्स वापरकर्त्यांच्या वापरास आणले होते. हे नवीन फीचर्स सर्वांना आवडले होते. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत. कोणते आहेत नवीन फीचर्स?

१. Expiring Media

Whatsapp new features marathi
Credits: WABetaInfo

व्हॉट्सअॅप Expiring Media असे प्रमुख आकर्षण असणार आहे. हे नवीन फीचर्स येणार अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. Self-Destructing Messages आणि Disappearing Messages या फीचरद्वारे वापरकर्त्याने एकदा फोटो, व्हिडिओ आणि GIF पाहिल्यानंतर काही वेळानंतर डिलीटहोणार आहे. WhatsApp Beta मध्ये हे फिचर सध्या वापरात आहे.

२. History Sync

History Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येणार आहे. या फिचर मुळे युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट हस्तांतरण करु शकतील. यामुळे आयफोन्स वरून चॅट Android वर हस्तांतरण करून शकतात.

३. Storage Control

यामध्ये, व्हॉट्सअॅप वापरकर्ते आपल्या स्टोरेज मध्ये अनेक ऑप्शन मिळवू शकतात. यामुळे स्टोरेज मध्ये बदल करू शकतो. युजर्स आपल्या स्टोरेज मध्ये बदल करू शकतील. ज्या फाईल्स ची गरज नाही ती फाईल्स आता सहजरीत्या डिलीट करू शकतील.

४. Vacation mode

व्हॉट्सअॅपकडून या फीचरला रिलीज करण्यात येणार असल्याची माहीती आहे. या फीचरद्वारे युजर्स मेसेज मध्ये येणारे संदेशाला म्यूट करू शकतील. व्हेकेशन मोड मध्ये नवीन संदेशांच्या नोटीफिकेशन ला वरच्या बाजूला येण्यापासून रोखू शकतो.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.