खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना जामनेर मध्ये चालु सभेतून व्हिडिओ कॉल केला आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर घोषणाबाजी करत दणाणून सोडला.
सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजप सरकार मंत्री गिरीश महाजन ह्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला गेल्याची चर्चा सर्वत्र झाली.
हल्लाबोल यात्रेच्या जामनेर मधील सभा आणि रॅली दरम्यान रस्त्यावरील लाईट बंद करणे, भाजपा समर्थकांना घुसवून सभेत व्यत्यय आणणे असे प्रकार झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सुर होता. सभेला परवानगी मिळणार नाही यासाठी गिरीश महाजन यांनी खुप खटाटोप केल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या होत्या.
याचा खरपूस समाचार घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकार हुकूमशाही करत असल्याने हे लोकशाहीसाठी बाधित असल्याची टीका भाजप सरकारवर केली. त्यातच शरद पवार यांना चालु सभेत व्हिडिओ कॉल लावल्याने सभेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सभेला झालेल्या अटकावाचा निषेध केला.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details