दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळून काळ लोटला परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही असा प्रश्न मनसे चे संस्थापक राज ठाकरे उपस्थित केला.
महाराष्ट्र जाती-पातीच्या विळख्यात अडकत चालला असून हे राज्याच्या विकासाला घातक असल्याचे राज ठाकरे यांनी रविवारी औदुंबरच्या सदानंद साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिक लढले होते. मात्र आज मराठी माणूसच जर संपला तर मराठी भाषा कशी टिकणार? दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळून काळ लोटला परंतु मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा का मिळत नाही असा प्रश्न मनसे चे संस्थापक राज ठाकरे उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की गुजराथी भाषेला अर्ज न करताही हा दर्जा मिळू शकेल. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, साहित्यिक, कवी यांनी आपली मराठी माणसाच्या हिताची भूमिका ठामपणे मांडण्याची आज गरज आहे. अन्यथा भावी पिढी आपणास दूषण देईल.
मुंबईतील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिक्रिया देतात, मात्र माझ्या महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करतात यावर भाष्य करण्यास त्यांना वेळ नाही अशी चपराक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना लगावली. राज्यातील शहरे गिळली जात असताना साहित्यिकांनीही आज आपल्या साहित्याच्या माध्यमातून आवाज उठवात रहावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.