वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी दिलेला संदेश सोशल मीडियावर सगळीकडे शेअर केला जात आहे. यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाउनवर सरकारच्या पुढच्या हालचालीबद्दल भारतीय चिंताग्रस्त झालेले आहेत.
कोरोना व्हायरस च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डब्ल्यूएचओ चार चरणांच्या लॉकडाउन चे अनुसरण करण्यास सांगितले असल्याचे या फोटो मध्ये फिरत आहे. भारत सुद्धा याचेच पालन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात लॉकडाउन वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे त्यामुळे अनेकजण भयभीत झालेले आहेत.
WHO चा वायरल होत असलेल्या फोटो मध्ये काय लिहिले आहे?

यात असे लिहिले आहे की, WHO ने जारी केलेल्या लॉकडाउन कालावधीच्या प्रोटोकॉल आणि प्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे. त्यात म्हटले आहे की डब्ल्यूएचओने लॉकडाऊन कालावधी चार टप्प्यात विभागला आहे आणि भारत सरकारही याचेच पालन करत आहे.

संदेशानुसार, पहिल्या चरणात, १ दिवसाचा लॉकडाउन पाळला जाईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २१ व्या दिवसाचा लॉकडाउन येईल. त्यानंतर पाच दिवसांचा विश्रांतीचा कालावधी येईल. पाच दिवसांनंतर, लॉकडाउनचा टप्पा ३ लागू केला जाईल, जो २८ दिवस चालेल. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांचा विश्रांती घेण्यात येईल. आणि नंतर अंतिम लॉकडाउन १५ दिवसांचे असेल.
WHO मॅसेज मागील सत्य काय आहे?
हा संदेश खोटा असल्याचे स्पष्टीकरण देणार्या भारतातील डब्ल्यूएचओने दिलेलेआहे आणि लॉकडाउन कालावधीसाठी डब्ल्यूएचओ संस्थेने असे कोणतेही प्रोटोकॉल तयार केलेले नसल्याचे म्हणले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये लिहिल्याप्रमाणे जगातील कोणताही देश या लॉकडाऊन नियमांचे अनुसरण करत नाही. लॉकडाउनसाठी प्रत्येक देशाने स्वतःचे नियम आणि कायदे केलेले आहेत. अमेरिकेने ठराविक प्रांत बंद केले आहेत तर चीन ने सुद्धा अशाच प्रकारे लॉकडाउन केले होते. त्यानुसार प्रत्येकजण आपापले नियम करून लॉकडाउन पाळत आहे. परंतु भारतात संपूर्ण देशभर लॉकडाउन केला गेला आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.