लेनिन कोण होता?
व्लादिमिर इलीच लेनिन चा जन्म रशियामध्ये सिंविर्स्क नावाच्या ठिकाणी झाला. त्यांचे वडील शाळांचे निरीक्षक होत. त्याच्या आई, एका चिकित्सकाची मुलगी होत्या आणि एक सुशिक्षित स्त्री होत्या. १८८६ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर लेनिन यांच्या आईवर कुटुंबातील सर्व भार पडला. त्या काळात रशिया झारच्या अधिपत्याखाली होता. १८८७ मध्ये झार तिसरा अलेक्सांडर याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली लेनिन यांचा मोठा भाऊ अलेग्जांदर ला लहानपणी फासावर लटकावण्यात आले आणि त्याची मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. ही घटना शाळेत शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या लहान म्हणजेच लेनिन च्या मनात बसली.

लेनिन शिक्षण संपवून कायदा शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दखल झाला. तिथे शिकणाऱ्या मुलांनी त्याच्या भावाच्या फाशीच्या आणि बहिणीला झालेल्या तुरुंगवासाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनात सहभाग घेतल्याने ४५ विद्यार्थ्यांसह त्या मुलाला कॉलेजातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे लोक त्याच्याकडे क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून पाहू लागले.
लेनिन कोण होता?
१८ वर्ष वय असताना हा मुलगा तिथून स्थलांतर करून सामोर येथे आला. शिक्षण बंद असल्याने त्याने पुस्तके मिळवून वाचायला सुरुवात केली. या काळात मार्क्स त्याच्या वाचनात आला. रशियाच्या समस्यांवर मार्क्सवाद हा एकमेव उपाय आहे असे त्याला वाटू लागले. भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे त्याचे ध्येय बनले. त्यांने समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली.
१८९३ पासुन त्यांने लेख लिखाणास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होऊ लागले. १८९५ मध्ये रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांने ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी त्याला अटक केली. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला कैद कडून सैबेरियात पाठवण्यात आले. तिथून पुन्हा रशियात आल्यानंतर रशियातील सोशल डेमोक्रेटिक पक्षाचे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते.
त्यात त्याचे पक्षातील ज्येष्ठ व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने लेनिन पक्षातून आपल्या अनुयायांसह बाहेर पडला. आणि १८९८ साली त्याने बोल्शेव्हिक पार्टीची स्थापना केली.
१९०५ साली जानेवारी महिन्यात सेंट पिटसबर्ग येथे नागरी अशांतता निर्माण झाली. फादर गॅपोनच्या नेतृत्वाखाली शहरातल्या कामगारांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी झारच्या राजवाड्याच्या दिशेने मार्च सुरु केला. या हजारोच्या जमावावर झारच्या सैनिकांनी थेट गोळीबार केला. शेकडो कामगारांना कंठस्नान घातले. ‘ब्लड संडे’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या हत्याकांडात अनेक कामगार मारले गेले.

लेनिन ने यानंतर आपल्या ब्लोक्षेव्हिक पक्षाच्या लोकांना हिंसात्मक क्रांतीसाठी प्रोत्साहन देत सशस्त्र बंद उभारण्यास सुरुवात केली. पण या वेळी झारची सत्ता उलथून टाकण्याचे स्वप्न लेनिन ला पूर्ण करता आले नाही.
पुढे १९१७ साली त्याने रशियाच्या पुनर्निर्माणाची योजना बनवली आणि ती सफल झाली.
नेमक्या याच क्रांतीत लेनिनच्या नेतृत्वाने क्रूरतेचा कळस गाठला. १९०५ साली झालेल्या झारप्रणीत हिंसाचाराला सामोरे जात असताना त्याने “मास टेरर” ची पद्धत विकसित करायला सुरुवात केली होती. जुलै १९१७ मध्ये जेव्हा क्रांतिकारकांच्या हाती सत्ता आली, तेव्हा बोल्शेव्हिक पक्षाने आपल्या नेत्याला अज्ञातवासात ठेवले. लेनिन च्या विचाराने प्रभावित होऊन ऑक्टोबर १९१७ मध्ये बोल्शेव्हिकांनी सत्ता हस्तगत केली.
या काळात रशियात अल्पसंख्य असलेल्या बोल्शेविकांनी सर्व प्रकारच्या सशस्त्र लढ्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. लेनिन ने सत्ता स्थापनेनंतर जर्मनीशी एक करार केला. जमीनदारांकडून सशस्त्र बळ वापरून संपूर्ण जमीनीचे राष्ट्रीयीकरण करत कष्टकरी आणि शेतकर्यांना जमीनदारांच्या जाचातून मुक्त केले. श्रमिक कामगारांचे व्यवसायांवर राज्य आणून त्यवर श्रमिकांचा अधिकार प्रस्थापित केला. बँक आणि वाहतूक संसाधनांचे राष्ट्रीयीकरण झाले. कामगार आणि शेतकरी भांडवलदार आणि जमीनदारांपासून मुक्त झाले आणि संपूर्ण देशाच्या रहिवाशांमध्ये संपूर्ण समता स्थापित करण्यात आली. नव्याने स्थापित सोवियेत लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी लाल सैन्याची निर्मिती करण्यात आली होती. लेनिनने कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी जगाची ही पहिली व्यवस्था उभारण्याचे काम करण्याच्या कार्यात अनेकांना यमसदनी धाडले.

हे करत असताना रक्तरंजित क्रांती केली गेली त्यात अनेकजण मारले गेले. एकप्रकारे संपूर्ण रशियावर लेनिनने मान्यता मिळवली. त्याने एकहाती रशियाचा कारभार आपल्या हातात घेतला.
नव्या समाजरचनेची उभारणी करताना लोकसंख्येत थेट मित्र आणि शत्रू अशी वर्गवारी केली. मित्र म्हणून पहिल्या स्थानावर होता कामगार गट. त्यानंतर शेतमजूर आणि गरीब शेतकरी. आणि शत्रू म्हणून होता बुर्ज्वा वर्ग, जमीनदार, पोप आणि मार्क्सवादी विचारात मजुरांचे शोषण करणारे शेतकरी म्हणून ज्यांचे वर्णन होते तो वर्ग.
आपण लहान पूल तयार करण्यासाठी प्रथम प्रयत्न करणे आवश्यक आहे जे राज्याच्या भांडवलशाही द्वारे समाजवादाच्या माध्यमातून छोट्या शेतकर्यांच्या मालकीच्या जमिनीकडे नेतील. अन्यथा आपण कधीही लाखो लोकांना साम्यवादाचे नेतृत्व करणार नाही. क्रांतीच्या विकासाचा उद्देशाने जे काही शिकवले आहे ते हेच आहे.
-लेनिन १९२१ रोजी, NEP
या क्रांतीने सर्वहारा समाजाचे राज्य आणणे साध्य झाले असले तरी त्यासाठी लोकांच्या अमर्याद कत्तली झाल्या होत्या. सर्वहारा राज्य येणे गरजेचे होते ही अपेक्षा विधायक होते. पण ते आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन! मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेल्याने जगभरातून लेनिन वर टीका सुद्धा झाली.
लेनिन ला 20 व्या शतकातील सर्वात लक्षणीय आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते, लेनिन २० व्या शतका पर्यंत सोव्हिएत संघाचे विसर्जन होईपर्यंत एक व्यापक व्यक्तिमत्त्व संवादाचे मरणोत्तर विषय होते. ते मार्क्सवाद-लेनिनवाद चे एक वैचारिक आकृती बनले आणि अशाप्रकारे त्यांचा प्रभाव पडला. लेनिन यांच्याकडे त्यांचे समर्थक समाजवादाच्या आणि कामगार वर्गाचे विजेते म्हणून पाहतात, तर काहीजण त्यांना सामूहिक हत्याकांसास जबाबदार सत्ताधारी राजवटीचे संस्थापक आणि हुकुमशाही नेते म्हणतात.
२१ जानेवारी १९२४ ला वयाच्या ५३ व्या वर्षी लेनिन चा आजारपणामुळे गोर्की येथील आपल्या घरात मृत्यू झाला.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.