अयोध्या मध्ये राम मंदिर उभारणी ट्रस्टची पहिली बैठक होत असतानाच शरद पवारांनी बाबरी मशिदीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले आहे.
लखनऊ शहरात एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. लखनऊ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला शरद पवार उपस्थित होते.
श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट बैठक
दिल्लीमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ची स्थापना केल्यापासूनची पहिली बैठक पार पडली. महंत नृत्यगोपाल दास यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अध्यक्ष नेमण्यात आलं, तर विश्व हिंदू परिषद चे चंपत राय यांची महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. नृपेंद्र मिश्रा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव होते ते भवन निर्माण समितीचे अध्यक्ष असतील. गोविंद गिरी यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे स्वामी गोविंद देवगिरी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.