भारतातील विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी युक्रेन ला का जातात? 5 मुद्दे

0
भारतातील विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी युक्रेन ला का जातात? 5 मुद्दे

डॉक्टर बनण्यासाठी युक्रेन देशाची वाट धरण्याची गरज भारतातील विद्यार्थ्यांवर का येते? युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते युक्रेनमध्ये सध्या भारतातील १७०९५ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

भारतातील विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी युक्रेनला का जातात?

रशियाने केलेल्या युक्रेनवरील हल्ल्यात असंख्य भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. अनेकजण वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते.

डॉक्टर बनण्यासाठी युक्रेन ला प्राधान्य का दिले जाते?

1. जागतिक मान्यताप्राप्त पदवी

युक्रेनमधील एमबीबीएस पदवी भारतीय वैद्यकीय परिषद, जागतिक आरोग्य परिषद, युरोप, UK इत्यादींसह सर्वत्र मान्यताप्राप्त आहे.

2. भारतातील महागडे शिक्षण

भारतात MBBS पदवी घेण्यासाठी साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला १० ते १२ लाख रुपये वार्षिक शुल्क लागते. खाजगी महाविद्यालयातून डॉक्टर बनण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च होतात. सरकारी महाविद्यालयात कमी खर्च असून तिथे प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. सरकारी महाविद्यालय वार्षिक शुल्क सुमारे २ लाख रुपये आहे.

3. भारतात कमी सरकारी महाविद्यालये

भारतात डॉक्टर बनण्यासाठी दरवर्षी NEET परीक्षा देणाऱ्या साधारण १५ लाख विद्यार्थ्यांमध्ये केवळ १ लाख विद्यार्थ्यांनाच MBBS साठी प्रवेश मिळतो. म्हणजेच प्रवेश मिळवण्यासाठी १५ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या एक लाख मुलांमध्ये आपले स्थान मिळवताना झगडावे लागते. सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी तर खूप स्पर्धा असून त्यासाठी NEET मध्ये उच्च गुणांची आवश्यकता लागते. यामुळे उर्वरित लाखो विद्यार्थ्यांना बाहेरची वाट धरणे गरजेचे होते.

4. युक्रेन मधील कमी खर्चात शिक्षण

युक्रेनमध्ये, एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी वार्षिक शुल्क ४-५ लाख रुपये आहे, जे भारतातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्काच्या तुलनेत सुमारे तीन पट कमी आहे.

5. प्रवेश परीक्षा गरजेची नाही

सहसा ज्या विद्यार्थ्यांना भारतात सरकारी महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळत नाहीत ते एमबीबीएस अभ्यासक्रम करण्यासाठी युक्रेनला जाण्यास प्राधान्य देतात. भारतात तुम्हाला नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) उच्च टक्केवारीसह उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. युक्रेन मधील MBBS कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त NEET पात्र होणे आवश्यक आहे. गुणांची पात्रता यात नसल्याने पात्र झालेले विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी युक्रेन ची वाट धरतात.

या कमी अधिक कारणांमुळे भारतातील विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी युक्रेन सारख्या देशांची वाट धरतात.

© PuneriSpeaks

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.