मुलगी का नको आहे? | Artista Ajinkya Bhosale | PuneriSpeaks

0
मुलगी का नको आहे? | Artista Ajinkya Bhosale | PuneriSpeaks

मुलगी का नको आहे? | Artista Ajinkya Bhosale

अमित आणि मोनिका. दोघांच एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप म्हणजे कस सांगणार मी. प्रेम ते करतायत मी नाही. असो तर इतके एकमेकांवर दोघांच प्रेम आहे. अमित सी.ए. शिकतोय. आणि मोनिका सी.एस. दोघांच शिक्षण आणि प्रेम अस सुरळीत चालू आहे. प्रेम म्हंटल कि प्रेमाच्या शपथा, आणाभाका आल्याच. आणि मग असाच आज वेळ काढून दोघ एका बागेत भेटायचं ठरवतात.

तो नेहमी सारखा आधी येतो. आणि तिची वाट बघतो. ती येते आणि पहिल्यांदा सॉरी बोलते. अग गप ग चालत तेवढ अस म्हणून तिला जवळ घेतो आणि खांद्यावर हात ठेवून तिच्याशी बोलू लागतो. बोलता बोलता दोघ भविष्यातल बोलू लागतात.

अमित : माझ बघ हा फायनल अटेम्पट सुटला कि मी ऑफिस टाकेन. तू काय करायचं ठरवलंयस ?

मोनिका : मी काय माझ पण Internship झालीय सो मीही कंपनीत काम करेन. चालेल न तुला ?

अमित : हो. हे बघ आपण वर्षभर पैसे सेव्हिंग’ करू आणि त्यातून टोकन पुरते पैसे बाजूला काढून घर घेऊ. आणि बाकीचे लोन काढून हप्ते फेडू. एकदा का घर झाल कि मग आपल्या आपल्या घरी सांगू आपल हे नात, ऐकल तर ठीक नाहीतर पळून जाऊन करू लग्न असही ठरलच आहे आपल. हो पण केल तर आपणच एकमेकांशी लग्न करायचं.

मोनिका: हो मी न मस्त बाहेरची रूम सजवेन. शोभेच्या वस्तू. मस्त सोफा मध्ये एक काचेचा टेबल त्यावर नाजूक आर्टीफिशियल कुंडी खाली मस्त असा हैद्राबादी गालीचा टाकेन मरूण कलरचा. खिडक्यांना पांढरे पडदे. घरात कंटिन्यू भारी वास यायला हवा सो एअर च फ्रेग्रेंस मशीन लाऊ. दारावर मस्त आपल दोघांच नाव असलेली पाटी लाऊ. ती मी आणेन पुण्याहून. आणि मग बघ आत किचन मध्ये अस नाजूक काचेची भांडी नकोच फायबरची घेऊ उगीच कुठ फुटली तर सारखी आणत बसायची नवीन होणा आमु?

अमित: हो खर्चाच जास्त काय काम नाही काढायचं एकदाच सगळा खर्च करू आणि नंतर आहे ते सांभाळू.

मोनिका: हा मी पण तेच म्हणते. आणि बेडरूम मध्ये काय? एक बुद्धाची मूर्ती. शांत वाटत त्यांना बघून. आणि डबल चा बेड घेऊ. टीव्ही एक आणि ?

अमित: ते बेडरूमच बघतो मी ते माझ्यावर सोड. बेडरूम मध्ये काय करणार आहेस?

मोनिका: काय म्हणजे झोपायचं आपण रोज जवळ एका पांघरुणात.

अमित: आणि?

मोनिका: आणि काय हव तुला?

अमित: कळतय तुला आता नाटक नको करू तू

मोनिका: हा ते सगळ करू पण ऐक न आमु?

अमित: काय?

मोनिका: बाळाची घाई नको करायला आधी सगळ सेट करू आपण. हप्ते वैगरे फेडू एक दोन वर्षात सगळ नील झाल कि विचार करू चालेल?

अमित: हो चालेल.

हे सगळ करू म्हणत म्हणत वेळ कधी गेला समजल नाही पण सगळ हव असताना नंतर अमितने सांगितल कि बाळ झाल तर मुलगाच हवा नाहीतर माझी आई तुझ्याशी बोलणार नाही आणि मला ते नको.

मोनिकाने त्याला समजावलं बाळ ते बाळ असत आपल प्रेम असणारे ते त्यात कसला फरक मुलगा आणि मुलगी. पण नाही कायच झाल नाही पुढ बोलण. माणसाला सगळ कळत काय हव काय चांगल काय सुखकर आहे. मग ती मुलगी पण एक जीव आहे हे का कळत नाही. त्याचं प्रेम अजून आहे. लग्न हि होणार आहे. पण हे सगळ त्यांना हव आहे ते मिळून मिळवणारे आहेत पण त्यांना मुलगी का नको आहे…..?

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

बायको: विचारा तिला छान आहे की…

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.