मी म्हणतो का कराव प्रेम | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
मी म्हणतो का कराव प्रेम | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मी म्हणतो का कराव प्रेम…

मी म्हणतो का कराव प्रेम आपण तिच्यावर जिला समजत नाही आपल्या मनातल्या भावना. ज्या भावना या आधी मी कधी अनुभवलेल्या नव्हत्या पण आता त्यांची सवय झालीय ते पण तिच्यामुळे.

माझ्या प्रत्येक बोलण्याचा वेगळा अर्थ असतो, पण तिला एकच अर्थ कळतो. ते म्हणजे माझे तिच्यावर प्रेम नाही. दगडाच्या मूर्तीला हात जोडून नारळ फोडून दही-दुध ओतून भरीस भर वर दक्षिणा पेटीत एक दिवसाच्या चहा आणि सिगरेटचा खर्च टाळत जरी टाकली तरी देवाला कळत आपल्याला काय होतंय? आपल्याला काय पाहिजे?
मग तिला नाही का समजत ?
मी म्हणतो का कराव प्रेम

तो देव कुणी पाहिलाय? देवाला कुठे मन शरीर श्वास आत्मा आहे तरीपण त्याला सगळ कळत. मग माझ्यासारखीच ती एक. फरक फक्त दोनच आहेत आमच्यात एक म्हणजे मी मुलगा ती मुलगी आहे आणि माझ तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तिला माझ प्रेम कळतच नाहीये. कस कळत नाहीये? चंद्राला कळत रोज रात्रीच यायचं. तो नाही येत दिवसा. सूर्याची पण वेळ चुकत नाही दिवसाला उगवायला. सगळ जग सजीव आहे अस नाही. पण जे निर्जीव आहेत त्यांना सगळ समजत मग तिला का समजत नाही.

मी म्हणतो मला तू आवडतेस. तर मला म्हणते. हो का बर फक्त मित्र म्हणून ना? मी म्हणतो तुझे डोळे छान आहेत त्यांकडे बघाव वाटत तर म्हणते मला उन्हाचा त्रास होतो मी गॉगल घालते. मी म्हंटल तु कित्ती गोरीपान आहेस चंद्र ही लाजला बघून तुला म्हणून आज तो आकाशात आला नाहीये. आणि लगेच ती मॉडर्ण मुलगी मोबाईल मध्ये मराठी कॅलेंडर उघडते आणि म्हणते कसा येईल चंद्र आज….. आज तर अमावस्या आहे. हे बघ दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी सुरु झालीय.
मी म्हणतो तू खूप बालिश आहेस. तुला काही कळत नाही. म्हणून मला तुझ बालिश मन आवडत. मला म्हणते पण मला कोणी आवडत नाही. कारण लोकांनी मला या आधी खूप आहे फसवले. मी दाखवतो तयारी, मी म्हणतो देईन तुला साथ कायम तुझ्या दुखात नेहमी. आनंदाला तु साजरे कर तुझ्या तू घरी. तर मला म्हणते Thank You माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. विश्वास आहे मैत्री आहे. मन जुळत आपल भांडण होत नाही आपल्यात. मी तुझे ऐकतो तु माझे ऐकतेस मग प्रेम करायला का नको म्हणतेस.

तर म्हणते …. मला कोणी दुसराच आवडतो. पण तो माझा होऊ शकत नाही. मी म्हंटल मी होतो न मग तुझा तर बोलते माझ आता कुणावर प्रेमच होणार नाही.
मी म्हणतो काय गरज आहे अशा मुलाची जो तुझा होत नाही आणि मी तुला माझ आयुष्य बनवतोय तर ते तुला कवडीमोल ही वाटत नाही. क्षुल्लक आहे का प्रेम माझ ?

सहज कुणाची आठवण आली म्हणून लिहिला. हा लेख. कसा वाटला सांगा.

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.