दिवाळीत किल्ला का बनवतात?

0
दिवाळीत किल्ला का बनवतात?

Why We Make Fort in Diwali? दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली आहे?
कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत.
लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं.

Why We Make Fort in Diwali?

यामागच शास्त्र, कारण बाकीच्यांसाठी काय आहेत मला माहित नाही पण माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि या प्रश्नाच उत्तर विचार करायला लावतच. Why We Make Fort in Diwali?
भारतात फार पूर्वीपासून दिवाळी साजरी केली जात आहे. पण दिवाळी या शब्दाला खरा अर्थ स्वराज्यात प्राप्त झाला.
सण साजरे करायचे तर परिस्थिती तशी लागते.
जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता ,
सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह. एकवर्षं दुष्काळ तर कधी रोगराईचे घर बसलेले असायचे. त्यात जुलमी राजवटीचा अत्याचार निमुटपणे सहन करावा लागत असे.
दिवाळीचा उत्साह, विश्वास देण्याच काम केल ते स्वराज्याने.
शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होते. लोकांना सुरक्षितता होती. जुलमी राजवटीकडून होणारे शोषण थांबले होते. लोकं खरोखर सुराज्य, रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते, अनुभवत होते.
त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला. स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर येत होती. हे सर्व पाहायला मिळत होते स्वराज्याच, घरच रक्षण करणाऱ्या गड किल्ल्यांमुळे. उन, वारा, पाऊस यांचा सामना करत, अनेक संकटांना तोंड देत परंतु आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे न हटणारे हे किल्ले, हे गड.
आपल्या सर्वांना प्रेमाने रक्षणारे हे किल्ले, स्वराज्याचे आधारस्तंभ. आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी पण किती प्रेम कराव या गडकोटांवर.

Best diwali fort making

स्वतःच्या लेकरांप्रमाणे मराठ्यांनी हे गड सांभाळले मग एवढ प्रेम, एवढा आदर का असाच होता, त्याचे समाजात प्रतिबिंब दिसू नये का? आणि म्हणूनच एक आदराच आणि प्रेमाच प्रतिक आणि घराच रक्षण करणारा किल्ला हा प्रत्येकाच्या घराबाहेर मग दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून घरोघरी किल्ले बनवले जातात.
दिवाळी म्हणाल कि समृद्धीच प्रतिक आणि समृद्धीच कारण म्हणजे आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले हे किल्ले.
यापेक्षा दुसर कारण माझ्यासाठी तर नाही .

आपणांस हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा. आपण लिहिलेले लेख आम्हास पाठविल्यास आम्ही नक्की प्रकाशित करू.

© PuneriSpeaks

अजुन वाचण्यासाठी:

आपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?

Mulshi Pattern Teaser | Pravin Tarde, Mahesh Manjrekar, Mohan Joshi

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.