बायको: विचारा तिला छान आहे की
रात्रीचे एक वाजले आहेत. सगळीकडे शांतता, घरात फक्त सिलिंग पंख्याचा आवाज येतोय. अधूनमधून तुमच्या घोरण्याचा आवाज येतोय. कुणा मुलाने किंवा मुलीने कूस बदलली तर तिला जाणवतय. बाहेर कसलासा आवाज झाला तर ऐकू येतोय. भुंकणाऱ्या आणि व्हीवळनाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने तिच्या काळजात धस्स होतय. तिचे डोळे बंद आहेत पण ती जागी आहे. ती जागी आहे विचार करण्यासाठी. मुळात ती विचार करत नाहीये ते आपोआप येतात. त्या विचारात कसबस रमून तिला एक डूलका लागतो. तोवर सकाळ होते. मग उठून रात्रीच जागरण माग टाकून ती पाणी भरून घेते. मग घरातली पारुशी काम उरकून नाश्ता बनवून डब्यासाठी जेवण बनवून तोवर तुमच, मुलाचं असेलच तर सासू-सासऱ्यांच बघून सर्वात पहिली उठणारी ती सर्वात शेवटी अंघोळ करते. सगळे घर लख्ख करून पण तिच्या हाताला दम नसतो.
इकडचा तिकडचा कप्पा साफ कर, कुठे कपाटातले कपडे निट घड्या करून ठेव. कुठे अळ्या-जाळ्या काढ अशात एक–दोन वाजतात. सकाळच्या नाष्ट्याला जमल तर खायचं नाहीतर नाष्टाच दुपारी करायचा. मग डोळ्यावर झापड येते. झोपून चालत नाही. दुपारीच संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून ठेवते. सोलायच्या निवडायच्या भाज्या निवडून त्याला लागणारा लसून कांदा सोलून चिरून ठेवते. दळण संपत आल असेल तर करून ठेवेत. या सगळ्यातून वेळ मिळाला तर थोडावेळ सोशल साईटवर सर्फिंग करते. कोण नवीन कोण जुन्या मित्रांसोबत पुन्हा तरुण होऊन जाते. तरुण होता होता घड्याळाचा काटा पाचवर जातो आणि असेलच तर सासू सासऱ्याना चहा बनवून देते. मग मुलांना आणायला शाळेत जाते. घरी आणून त्याचं आवरून त्यांना खायला देऊन क्लासला सोडते. मग माघारी येऊन पुन्हा केर वारे करत सात वाजतात. मग एखादी मालिका बघे पर्यंत तुमची यायची वेळ होते. मग तुम्हाला काय हव नको बघेपर्यंत परत मुलांना जाऊन क्लास मधून आणते. मग मस्त जेवण बनवून सगळ्यांना जेवायला वाढते. जेवण झाल कि सगळ आवरून. जेवण पचलेल सुद्धा नसत तोवर ती भांडी घासायला बसते.
मग मुलांचा अभ्यास तपासून त्यांना झोपायचं फर्मान सोडते. तुमच्या चौकश्या करून तुम्हाला हि ती झोपायला सांगते. सगळे जेव्हा झोपून जातात तेव्हा ही पाठीला, कुठ टाचेला क्रीम लाऊन दुखण्याला पांघरुणात गुदमरून मारून टाकते. पुन्हा तोच तो सिलिंग पंखा सुरु होतो आणि त्याचा आवाज आणि ती पुन्हा जागी होते.
ती सगळी काम करते लग्नाच्या आधी शिकण्यासाठी आणि सगळ शिकून झाल्यावर ती लग्न करते. म्हणून तिला बायको म्हणतात. जे ती करते त्याची किंमत न मोजण्याइतकी असते. आणि बदल्यात तिला पगार नको. बस मुलांकडून एक आई म्हणून आदर आणि एक नवरा म्हणून आधार हवा असतो. बाकी प्रेम आपण करतोच तिच्यावर….. बस एकदा “विचारा तिला” काय होतंय का ग तुला? काय त्रास आहे का? कसल टेन्शन आहे का? ती फक्त नाही म्हणेल, मनात सगळ ठेवेल. पण म्हणा एकदा कौतुकाने किती करतेस तू आमच्यासाठी…. माझ तुझ्यावर प्रेम आहे तुझ्यावर खूप जास्त, बघा किती बोलेल ती मनापासून तुमच्याशी, हे जर का रात्री बोललात तुम्ही तर काय माहित तिच्यासोबत तुम्हाला हि ती बोलत बोलत जागवेल….
फक्त विचारा तिला एकदा…
लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426
©PuneriSpeaks
कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवजयंती च्या तोंडावर राजधानी रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला तडे