महिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या महाराष्ट्रातील ३ खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २८ जुलै रोजी विधान केले , महाराष्ट्रातील महिला खेळाडू उत्कृष्ट क्रिकेट खेळून संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे. त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये राज्य सरकार देत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील स्मृती मंदना , मोना मेश्राम , पूनम राऊत या खेळाडू आहेत. पण त्यांना खरंच बक्षिसाची रक्कम मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपये! pic.twitter.com/6lNlJp9luX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 29, 2017
आतापर्यंत राज्यातल्या 123 खेळाडूंना जाहीर केलेली 5 कोटी 20 लाखांच्या बक्षिसाची रक्कम अजूनही त्या खेळाडूंना सरकारने दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला क्रिकेटर पूनम राऊत, मोना मेश्राम आणि स्मृती मानधनाला 50 लाखांचं इनाम मिळणार का, हा प्रश्न आहे.