पुण्यातील रस्त्यांवर अवतरला यमराज, नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन

0
पुण्यातील रस्त्यांवर अवतरला यमराज, नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन
Spread the love

पुण्यातील नागरिकांनी घरी राहा असे आवाहन करण्यासाठी स्वारगेट चौकात आज यमराज अवतरला.

पुणे शहर कोरोनाचे केंद्रस्थान झाले असून लॉकडाउन लागू केल्यानंतरही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. दहा दिवसांचा कडक लॉकडाउन सुरू असून शहरातील चौकाचौकात व प्रत्येक रस्त्यांवर पोलीस कडक बंदोबस्त देत आहेत. अनेकदा सांगूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांना समज देण्यासाठी आज चक्क नवीन कल्पना राबवण्यात आली. चक्क यमराज रुप धारण करून सुजय खरात नागरिकांना समज देण्यास रस्त्यावर उतरले.

नागरिकांचे प्रबोधन करताना “तुम्ही घरात बसा, अन्यथा माझ्या सोबत यायला तयार रहा”, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. चौकात उभे राहून दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे प्रबोधन करत त्यांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण प्रतिकात्मक यम आणि रेडा चौकात आणून अशा नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.