होय, मी बदलत आहे

0
होय, मी बदलत आहे

होय, मी बदलत आहे !

दिवसाचे महिन्यांचे वर्ष कसे पटकन होते आणि कॅलेंडर बदलते. आणि आता मी देखील बदलत आहे !
आठवडे, आठवड्याचे महिने अन्
माझे आई, वडील, बहिण, भाऊ, मुलं, मुली, बायको, मित्रमैत्रिणी यांच्यावर प्रेम करतोच पण आता मी स्वतःवर ही प्रेम करायला शिकलोय!

होय, मी बदलत आहे …
कारण आता मला समजतंय की पूर्ण जग काही माझ्या खांद्यावर नाहीये, मन हलकं झालं!

होय, मी बदलत आहे ….
आता मी गरीब भाजीवाला आणि फळवाला यांच्याबरोबर भाव कमी करत बसत नाही, नाही तरी काही जास्त रुपये मोजल्याने माझ्या खिशाला भोक नाही पडणार! कदाचित ते पैसे त्याला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा औषधासाठी उपयोगी पडतील !

होय मी बदलत आहे …
हल्ली मी रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला यांना पैसे देऊन सुट्ट्या पैशांची वाट न पाहता पाठ फिरवतो, कुणास ठाऊक ते जास्तीचे पैसे त्याच्या चेहऱ्यावर हसू आणतील! नाहीतरी तो पैसे कमावण्याकरता माझ्यापेक्षा खूप जास्त मेहनत करतो!

होय, मी बदलत आहे …..
मोठ्या व्यक्तीला मी आता हे सांगणे सोडलंय की त्यांनी ती गोष्ट मला खूप वेळ सांगितली आहे, कारण तीच गोष्ट त्यांना त्यांच्या आठवणींच्या गल्लीत घेऊन जाते! आणि त्यांची तीव्रता कमी करते!

होय मी बदलत आहे …..
मी आता हे शिकलोय की समोरील व्यक्ती चुकली तरी तिला बरोबर करणे किंवा चुकीला दुरुस्त करणे ही माझी जबाबदारी नाही, कारण मानसिक शांती ही अचूक असण्यापेक्षाही जरुरी आहे!

होय, मी बदलत आहे ..
आता मी समोरच्याची स्तुती मोकळेपणाने करतो कारण त्यामुळे समोरचा आणि मी दोघेही आनंदी अन् उत्साही होतो! समोरच्याला स्फूर्ती येते!!

होय मी बदलत आहे …
आता शर्टाची, कुर्त्याची सुरकुती मला त्रास देत नाही, कारण आता हे समजलंय की माणसाची बाह्य नव्हे तर आतील व्यक्तिमत्व हेच जास्त महत्वाचे! तुमचे ज्ञान आणि अनुभवच तर तुमच्यासाठी बोलतो!

होय मी बदलत आहे …..
मला महत्व न देणाऱ्या व्यक्तीजवळ मी थांबतच नाही, त्याला नाही तरी मला माझी किंमत, महत्व माहिती आहे.

होय, मी बदलत आहे ….
आता मी तथाकथित मोठ्या माणसाला महत्व देत नाही किंवा त्याच्यासमोर दबूनही जात नाही कारण आपण त्याला भाव देतो म्हणून तो मोठा होतो, प्रसिद्ध होतो! तो मात्र आपल्याला काहीच देणार नसतो!

होय, मी बदलत आहे ….
उंदरामांजराच्या खेळासारखं जर मला कोणी शर्यतीत हरवण्याकरता हीन राजकारण करत असेल तर मी शांत राहतो, कारण मी उंदीर नाही आणि शर्यतीत पळत पण नाहीये!!!

होय ना, मी बदलत आहे ….
माझ्या भावना व्यक्त करायला मला कसलीही लाज वाटत नाही, मी रडतो, हसतो, चिडतो, रुसतो, नाचतो, शेवटी ह्याच भावना मला माणूस बनवतात ना!!

होय हो, मी बदलत आहे …..
मी शिकलोय ! मी शिकलोय की माझा अभिमान किंवा स्वाभिमान हे नात्यापेक्षा महत्त्वाचे नाहीयेत! शेवटी अभिमान मला सगळ्यांपासून वेगळेच करणार! आणि खरी नाती मला कधीच एकट्याला राहू देणार नाहीत!!

होय, मी बदलत आहे …
मी हे शिकलोय की एकांत हा एकटेपणापेक्षा अमूल्य आहे. एकटेपण खायला उठतं तर एकांत शांती मिळवून देतो!

होय, मी बदलत आहे …
माझं आहे त्यासाठी मी भांडतो, हक्कासाठी लढायला शिकलोय! अन्याय सहन करणे हे अन्याय करण्या इतकेच वाईट आहे, हे मला उमगलं आहे!!!

होय, मी बदलत चाललोय….
मी आजचा दिवस असा जगतो, जणू माझ्या आयुष्याचा तो शेवटचा दिवस आहे, कुणास ठाऊक आजचा दिवस माझ्या साठी शेवटचा असू शकेल!!
मी जे मला आनंदी करतं, मला समाधान देतं ते करतो, कारण माझ्या आनंदासाठी मी जबाबदारी स्वीकारली आहे, इतरांनी नाही!!!

माझ्या नवीन मी वर माझे खूप प्रेम आहे!!!!!

आपणा सर्वांना येणाऱ्या नविन वर्षाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

आवडल्यास नक्की शेअर करा….

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.