पोलिसांशी वाद घालणाऱ्या “त्या” झोमॅटो गर्ल ची १४ महिन्यानंतर जामिनावर सुटका

0
पोलिसांशी वाद घालणाऱ्या “त्या” झोमॅटो गर्ल ची १४ महिन्यानंतर जामिनावर सुटका
Share

झोमॅटो मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा वाशी पोलिसांशी हुज्जत घालणारा व्हिडीओ 14 महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. पोलिसांशी रस्त्यावर पार्किंग वरून भांडण करणाऱ्या प्रियंकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पोलिसांशी हुज्जत घातल्याने ती संपूर्ण महाराष्ट्रात झोमॅटो गर्ल म्हणून सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. तब्बल १४ महिने उलटल्यानंतर तिला जामीन मिळाला आहे. तिची रवानगी भायखळा जेल मध्ये केली गेली होती.

आता पुढे आता जीवनात परत उभे राहण्याचे मोठे आव्हान आहे

प्रियंका मोगरे

पोलिसांशी हुज्जत घालणे किती महागात पडू शकते हे एका घटनेने पाहायला मिळत आहे. प्रियंकाला अटक झाली त्यानंतर तिची साडे तीन वर्षांची मुलगी तिच्या आजी आजोबांसोबत राहत होती.

आता समोर मोठे आव्हान असून वृध्द वडील, चार वर्षांची मुलगी आणि हाताला काम नाही अशा परिस्थितीत प्रियंकाला जीवनाला पुन्हा दिशा देण्याचे काम करायचे आहे. तिच्यावर सुरू असलेल्या केस अजूनही सुरू असून केस मागे घेण्याची मागणी तिची मदत करत असलेल्या संघटनांनी केली आहे.

झोमॅटो गर्ल वाद: त्यादिवशी नक्की काय घडले होते?

प्रियंका मोगरे ही 8 ऑगस्ट 2019 रोजी झोमॅटो ऑर्डर देण्यासाठी गेली होती. व्हिडिओतील पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियांकाने तिची स्कूटर सेक्टर 17 मधील “नो पार्किंग झोन” येथे उभी केली होती. वाहतुक पोलिसांनी यावेळी तिच्या गाडीचा फोटो काढायला सुरुवात केल्यानंतर पोलीस आणि तिच्यामध्ये वादावादी सुरू झाली. प्रियंका मोगरे यांनी तिच्या स्कूटरचे फोटो घेत असलेल्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिने फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या. कर्तव्य बजावणारे अधिकारी परिस्थिती हाताळू शकले नाहीत म्हणून वरिष्ठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले पण पोलिसांनी दावा केला की तिने त्यांना सुद्धा शिवीगाळ केली. वाशी पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

प्रियंका बद्दल थोडी माहिती

प्रियंका पदवीपर्यंत शिकलेली आहे. प्रेम विवाह आणि त्यानंतर आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलीसोबत ती स्वतंत्रपणे राहत होती. गोवा मध्ये ती आधी एचआरमध्ये ती कामाला होती. गोव्यातील काम सोडून नवी मुंबईमध्ये झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून ती काम करत होती. पोलिसांशी वाद घातल्याने तिला अटक करण्यात आली होती.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.