झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार

0
झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार

नवी दिल्ली: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झोमॅटो कंपनीने जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे असे सांगितले आहे. कंपनीत 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.’ यासंदर्भात अधिक माहिती देताना झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी असे म्हटले की, गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसायाचे अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि यातील बरेच बदल कायमस्वरुपी होणार आहेत. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात काम मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे कंपनीतील 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात येणार आहे. त्यांना 24 तासाच्या आतमध्ये कंपनीच्या नेतृत्व टीमकडून झूम कॉल कडून निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलेले नाही पण त्यांच्यासाठी कंपनीकडे काम नाही आहे अशांना फक्त 50 टक्के पगार देण्यात येणार आहे.’

पुण्यात ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी, पण…

सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बिग बास्केट, ग्रोफर्स, फ्लिपकार्ट,अॅमेझॉन, डी-मार्ट, झोमॅटो यांसारख्या कंपन्या घरपोच किराणा सामान पोहोचवत आहे. नागरिकांनी घरात राहावं त्यामुळे घरपोच सेवा देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत.

असध्या देशातील अनेक कंपनीनी त्यांच्या कामगारांचा पगार कपात करून वर्ग केला आहे. अनेक नोकरदार कंपनी व्यव्स्थापकयांच्यावर नाराज आहेत. त्यामध्ये मोठ्या कंपनी सुद्धा असे वागत असतील तर नोकरी करणाऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. नोकरी करणारा वर्ग हा इएमआय, भाडे, घरखर्च, शाळा फी यामध्ये अडकलेला असतो. या वर्गासाठी कोताही सक्त कायदा नसल्याने अनेकांच्या उपजीविकेवर टांगती तलवार उभी राहिली आहे.

©PuneriSpeaks

महाराष्ट्र आणि पुणे मधील विविध अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम वर फाॅलो करा.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.